Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांची भरती
1 min read

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांची भरती

Dharashiv Tuljapur Recruitment 2024 :

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. Tuljapur

● पद संख्या :
47

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

2) नेटवर्क इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता.

3) हार्डवेअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता.

4) सॉफ्टवेअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता.

5) लेखापाल : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

6) जनसंपर्क अधिकारी : 1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

7) जनसंपर्क अधिकारी : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

8) अभिरक्षक : 1) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा पुरातत्वशास्त्र या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पदवी असणे 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

9) भांडारपाल : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.

10) सुरक्षा निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 3) महिला उमेदवाराची उंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी).

11) स्वच्छता निरीक्षक : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

12) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी : 1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

13) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक, 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी)(कमीत कमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक 4) महिला उमेदवाराची उंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

14) सहाय्यक स्वच्छता निरीक्षक : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

15) प्लंबर : 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र.

16) मिस्त्री : 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र. Tuljapur

17) वायरमन : 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र.

18) लिपिक-टंकलेखक : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील. Tuljapur

19) संगणक सहाय्यक : संगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अर्हता.

20) शिपाई : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे

● अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्ग – रु.1,000/- [मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी – रु.900/-

● वेतनमान :
रु.15,000/- ते रु.1,22,800/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज सुरू होण्याची तारीख :
23 मार्च 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love