Railway : रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती
Railway TTE Recruitment 2024 :
भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board) कडून लवकरच प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तब्बल 8000 हजाराहून अधिक जागांसाठी ही भरती होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://indianrailways.gov.in/ ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून 2024 मध्ये संपणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही.
● पद संख्या :
8,000+
● पदाचे नाव :
प्रवासी तिकीट परीक्षक
● शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
● अर्ज शुल्क :
सामान्य आणि ओबीसी : रु. 500/- [अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गासाठी : रु. 300/-]
● वेतनमान :
रु. 27,400 ते रु. 45,600 [अपेक्षित]
● निवड करण्याची प्रक्रिया :
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी